Posts

Showing posts from July, 2017

Bg

Image

Photo

Image

श्री क्षेत्र वडवळ

श्री क्षेत्र वडवळ महाराष्ट्रातील पुण्य क्षेत्रामध्ये श्री नागनाथांचे श्री क्षेत्र वडवाळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पंढरीची जशी एकादशीची वारी रुढ आहे तशी श्री नागनाथांची अमावस्येची वारी रुढ आहे. दूरवरुन असंख्य लोक दरमहा वारीस येत असतात. वडवळ हे गाव सोलापुर जिल्ह्यात असुन मोहोळ रेल्वे स्टेशन पासून दोन मैल अंतरावर आहे. येथेच श्री नागनाथ महाराजांचे स्थान आहे. प्रतिवर्षी वडवळ येथे चैत्र मासी व मोहोळ येथे वैषाख मासी यांची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते. साक्षात शंकर जाणुनिया संत लागती पायी | लीला विग्रही अवतरला तो येथे संशय नाही|| ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्व ही जातो| आठविले ते एक्या भावे उद्धवचिद्घन गातो|| असे म्हटले आहे. सोलापुर जिल्हयात पंढरपुर मार्गावर मोहोळ (चंद्रमौळी) हे गाव आहे. त्या गावी सुमारे ८०० वर्षापूर्वी अत्यंत सात्विक अशा एका ब्राम्हण घराण्यात श्री हेगरस यांचा जन्म झाला. ऋग्वेदी पवित्र ब्राम्हण | शाकल शाखा अश्वालायन | भारद्वाज गोत्र जाण | नाम तयांचे हेगरस || एकदा त्यांची आई सुमती हिने त्यांना द्रव्य पुत्रांदिकांचा पाश टाकून मोक्ष प्राप्तीचा मार्ग स्वीकारण्या विषयी ...