श्री क्षेत्र वडवळ
श्री क्षेत्र वडवळ
महाराष्ट्रातील पुण्य क्षेत्रामध्ये श्री नागनाथांचे श्री क्षेत्र वडवाळ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पंढरीची जशी एकादशीची वारी रुढ आहे तशी श्री नागनाथांची अमावस्येची वारी रुढ आहे. दूरवरुन असंख्य लोक दरमहा वारीस येत असतात.
वडवळ हे गाव सोलापुर जिल्ह्यात असुन मोहोळ रेल्वे स्टेशन पासून दोन मैल अंतरावर आहे. येथेच श्री नागनाथ महाराजांचे स्थान आहे. प्रतिवर्षी वडवळ येथे चैत्र मासी व मोहोळ येथे वैषाख मासी यांची मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते.
साक्षात शंकर जाणुनिया संत लागती पायी |
लीला विग्रही अवतरला तो येथे संशय नाही||
ऐसे अपार संत वर्णिता संशय सर्व ही जातो|
आठविले ते एक्या भावे उद्धवचिद्घन गातो||
असे म्हटले आहे.
सोलापुर जिल्हयात पंढरपुर मार्गावर मोहोळ (चंद्रमौळी) हे गाव आहे. त्या गावी सुमारे ८०० वर्षापूर्वी अत्यंत सात्विक अशा एका ब्राम्हण घराण्यात श्री हेगरस यांचा जन्म झाला.
ऋग्वेदी पवित्र ब्राम्हण | शाकल शाखा अश्वालायन |
भारद्वाज गोत्र जाण | नाम तयांचे हेगरस ||
एकदा त्यांची आई सुमती हिने त्यांना द्रव्य पुत्रांदिकांचा पाश टाकून मोक्ष प्राप्तीचा मार्ग स्वीकारण्या विषयी उपदेश केला. तेव्हा बारा वर्षे पर्यंत त्याने रानात जावून गाईची सेवा केली. बारा वर्षे सेवा केल्यानंतर आपल्या हातून तपश्चर्या झाली ह्या आनंदाने जेव्हा घरी आले व आईला सर्व हकिकत सांगितली. तेव्हा पुढे काही दिवसातच आपल्या मुलाला तेल स्नान घालावे या निमीत्ताने सुमती माताने त्या हेग्रसांना जवळ बोलावून त्यांच्या डोक्यावरील केस विंचरु लागली तेव्हा त्यातील काही केस उपटले. वेदना असह्य झाल्यावर आई मला त्रास होतो तर तू सावकाश विंचर असे त्यावेळी हेग्रस म्हणाले, तेव्हा माता म्हणाली.
ते हासुनी तै वदली बारे बहू छेदिले त्रुणे जेव्हा |
तेणे प्रुथ्वी दु:खित झाली तुज दाविते कशी तेंव्हा ||
जयापरी आपुले हे वपु तैसेच विराट देह ही वसुधा |
त्रुण व्रुक्ष केश जाण दोहिसी साम्यता असेचि बुधा ||
या तुझियानुष्टाने देवाला दु:खविले बहुत मुला ||
आता निर्वाणपरमद प्राप्ती ती कसे घडेल तुला ||
हे ऐकुन आपल्या हातुन पुण्य घडण्याऐवजी पाप कर्मच घडले याचे फार वाईट वाटले. जीवनाचे खरे सार्थक करण्यासाठी मातेचे दर्शन घेऊन ते अरण्यातून तपश्चर्या करत माहुरगडावर येऊन पोहचले. तेथे रेणुकामातेची केली.
षोडषोपचारे नित्य पुजा | महाविद्या महाराजा |
हेगरस बैसला त्याच काजा | रेणुका प्रसन्न व्हावया ||
असे बारा वर्षे केली, शेवटी रेणुकामाता प्रसन्न होईना म्हणुन यज्ञकुंड पेटवून त्यात आत्माहुती देण्यास प्रारंभ केला. इतक्यात देवी प्रसन्न झाली . वर माग म्हणाली, तेव्हा सदगुरु क्रुपेविषयी अतिशय आतुर झालेला असा हा दुसरे काय मागणार ?
म्हणे ब्रह्मादिका दीक्षागुरू | तो मज व्हावा गोचरु|
जो भवसागरीचे तारु | प्राणी यासी निर्धारी |
असे ऐकताच अशा सदगुरूची व ह्या हेगरसाची गाठ पडण्यासाठी तिने योगमायेने त्यांना हस्तिनापुरापलीकडील मानस सरोवराकाठी नेऊन ठेवले व सदगुरुच्या आगमनांची वेळ व खुण सांगितली . ती त्याप्रमाने अद्रुश्य झाली. सांगितलेली खुण पटल्यावर हेगरसांनी श्री चे चरण धरले. त्यावेळी जगदंबा पांढरी घार घेऊन त्यांच्या मस्तकावर फिरत होती.
हेगरसांनी पाय पकडताच त्यांनी घोड्यास टाच मारली व घोडा आकाशात उडविला. तरीही हेगरसांनी पाय सोडले नाहीत. त्यांनी ह्यांच्या पाठीवर फटकारे मारले तरी ते पाय सोडेनात त्यावेळी...
ब्रम्हमूर्ती आशंकली | चिंतूनी स्वारी दमली |
द्रुष्टी नभाकडे नेली | होई भ्रम निरसन ||
तेव्हां
मग उतरुनी आले तळवटी | भक्ता दिली प्रेमे भेटी |
स्वानंदे पाठी थापटी | भला भला म्हणोनी |
त्यावेळी सदगुरुने त्यांना उपदेश करुन क्रुतार्थ केले. हेगरस हे खर्या अर्थाने संत होते म्हणुनच त्यांनी आपल्या बरोबर मातेचा व ग्रामजनांचा उद्धार व्हावा यासाठी महाराजांनी आपल्या गावी यावे म्हणुन आग्रह धरला. हेगरसांच्या आग्रहास्तव दिल्ली व पुणे जिल्ह्यातील केंदुर, पाबळ, कान्हूरमेसाई, निमगांव, मानूर, देगाव अशा मार्गाने संचार करित व अनेक भक्तांचा उद्धार करित ते मोहोळला गावाबाहेर येऊन थांबले. आपल्या भक्ताची परिक्षा घेण्यासाठी त्यांनी वेषांतर केले. अमंगल फकीराचा वेष घेतला. फकीर गावाबाहेर आले आहेत हे हेगरसांना समजताच ते धावतच आले व आपल्या सदगरुंना ओळखले. त्यांच्या कटोर्यातील अन्न भक्षण केले. हे गावकर्यांना समजल्यावर हेगरस ब्राम्हण बाटला म्हणून त्यांना बहिष्क्रुत केले व त्यांच्या घरावर हाड रोवले.
अक्षय्य त्रुतिया आल्यावर हेगरसांच्या घरी श्राद्ध कर्म करण्यास गावातील कोणी ब्राम्हण येईनात. खिन्न मनाने घरी परतल्यावर श्री नागनाथांनी खिन्न होण्याचे कारण विचारले आणि त्या श्राद्धकर्मास श्री नागनाथांनी स्वर्गातुन सर्व ग्रामस्थांचे पितर बोलावले.
उप्पर स्वर्गसे पितर बुलाये |
विमान उतरके टेकडी भर गये ||
बेद घोष तुंबल भये | निंदक बम्मन देखने आये |
देखत बडोंका दर्शन हुये | शर्माके हात जुडाये |
दिनरात तीन मिल रहे | सब आप अपने घर को ले आये ||
चौथे दिन गायब हुये|........
-(अज्ञानसिद्ध)
ही घटना ज्या ठिकानी घडली त्या ठिकाणाला विमान टेकडी म्हणतात. हे स्थळ मोहोळ येथे आहे. एवढे झाले तरीही काही ग्रामस्थ निंदा करु लागले. शेवटी श्री नागनाथांनी मोहोळ गाव सोडले. जंगलात पळत गेले. तेथे एका वडाचे झाड उन्मळून पडले होते . त्यास तयांनी उभे करुन पाणी घालताच त्यास नविन पालवी फुटली. त्या खालीच ते राहू लागले.
यावरुनच त्यास वडवाळ हे नाव पडले व स्वत:ला नागनाथांनी वडवाळसिद्ध नागनाथ हे नाव धारण केले.
श्री नागनाथ हे वडवळ येथेच राहिले. तेथे त्यांनी पैठनच्या बहिरंभट ब्राम्हणाला कुटून त्याचा गोळा बनवुन अग्निसंस्कार देऊन त्यावर जल शिंपडुन जिवंत केले व त्याचा उद्धार केला.
बहिरंभटाला कुटलेले उखळ व बहिरंभटाची समाधी वडवळ येथे अद्यापि भक्तांना पहावयास मिळते.
शेवटी श्री नागनाथांनी आपल्या शिष्यासमवेत लोकपयोगी खेळ खेळले. स्वहस्ते वडवळ येथे खर्गतीर्थ तयार केले. आपल्या भक्तांना वर देऊन शेवटी हेगरसांना
"यावत् चंद्र दिवाकरौ तावत्" वायुरुपाने येऊन तुझ्या वंशाला भेट दईन असा वर दिला.
त्याप्रमाने वडवळ येथे चैत्र मासी वद्य चतुर्थी व सप्तमीस तसेच मोहोळ येथे वैशाख शुद्ध त्रुतिया (अक्षय्य त्रुतिया) व सप्तमीस, मार्डी ता. उ. सोलापुर येथे अश्विन एकादशीस गुरु शिष्य भेटीचा सोहळा वरील ठिकाणी पाहण्यासारखा असतो.

Comments
Post a Comment